आजचे दिनविशेष व राशिभविष्य (दि.२४ मार्च २०२२)

जाणून घ्या आज गुरुवार दिनांक २४ मार्च २०२२ रोजीचे पंचांग, दिनविशेष व आपले राशिभविष्य

पंचांग – गुरुवार : फाल्गुन कृष्ण ७, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक / धनू, चंद्रोदय उ. रात्री १२.५७, चंद्रास्त सकाळी ११.०८, भारतीय सौर चैत्र ३ शके १९४३.

मेष : अर्थप्राप्ती होवून खर्चाचे प्रश्न काही प्रमाणात सुटतील. परिश्रमातून चांगले परिणाम दिसतील.

वृषभ : लोकप्रियता वाढेल. आरोग्यात सुधारणा होईल. धार्मिक कार्यात सहभाग राहील.

मिथुन : कुणावर विसंबून राहून करु नका. मित्रांची मदत होईल. एखादी शुभवार्ता मिळू शकते.

कर्क : व्यावसायीकांना चांगला दिवस. अधिकाराचा योग्य ठिकाणी वापर करा.

सिंह : अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. मन प्रसन्न राहील.

कन्या : कार्यक्षमता वाढीस लागून उत्साह वाढेल, तणाव कमी होईल.

तुळ : वादविवाद टाळून कामे मार्गी लावा. जोखमीची कामे टाळा.

वृश्चिक : प्रवासाचे योग येण्याची शक्यता अहे. संघटनेत जबाबदारीचे काम मिळण्याची शक्यता.

धनु : खाण्यापिण्याची काळजी घेणे हिताचे ठरेल. नविन योजना प्रभावशाली ठरतील.

मकर : कठोर परिश्रमाचा दिवस राहीला तरी मन प्रसन्न राहील. सुख समाधान मिळेल.

कुंभ : प्रवासासाठी चांगला दिवस राहिल. व्यापार उद्योजकांना चांगला दिवस.

मीन : कामे सहज मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रातील लोकांना संमिश्र दिवस राहील.

दिनविशेष – २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो. १८५५ – आग्रा आणि कलकत्ता या शहरा दरम्यान तार सेवा सुरू झाली.

हे ही वाचा…

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here