आजचे दिनविशेष व राशिभविष्य (दि.२६ फेब्रुवारी २०२२)

जाणून घ्या आज शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ रोजीचे पंचांग, दिनविशेष व आपले राशिभविष्य

पंचांग – शनिवार : माघ कृष्ण १०, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, चंद्रोदय पहाटे ४.०५, चंद्रास्त दुपारी २.१४, विजया (स्मार्त) एकादशी, भारतीय सौर फाल्गुन ७ शके १९४३.

मेष : आवडत्या वस्तूची खरेदी करता येईल. लाभदायक दिवस राहील.

वृषभ : अती उत्साहात चुक टाळावी. प्रिय व्यक्तीची भेट होवू शकते.

मिथुन : हितचिंतकांचा सल्ला महत्वाचा ठरेल. एखाद्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.

कर्क : व्यस्त दिनक्रम राहील. आर्थिक आघाडीवर अनुकुल दिवस राहील.

सिंह : खर्चिक दिवस राहील. अनावश्यक खर्च टाळावा लागेल.

कन्या : जुने प्रश्न मार्गी लागतील. माणसे पारखून कामे करावी.

तुळ : भविष्यातील तरतुदीचे योग्य नियोजन करावे लागेल. दिवस उत्साहवर्धक राहील.

वृश्चिक : हाती आलेली संधी सोडून चालणार नाही. एखादी चांगली बातमी समजू शकते.

धनु : कष्टाचे फळ नक्की मिळेल. शांतचित्ताने काम करावे लागेल.

मकर : अती विचार करणे चुकीचे ठरेल. घाईगर्दीत निर्णय घेण्याचा प्रयत्न करु नये.

कुंभ : हसत खेळत दिवस निघून जाईल. जनसंपर्कात वाढ होईल.

मीन : रचनात्मक कार्यात यश मिळेल. नवीन कामासाठी योग्य कालावधी राहील.

दिनविशेष

  • १९७५ ला गुजरात येथे देशातील पहिले पतंग संग्रालय “शंकर केंद्र” गुजरात च्या अहमदाबाद येथे स्थापन केले.
  • १९९५ ला अमेरिका आणि चीन यांच्या मध्ये कॉपीराईट या मुद्यावर चर्चा आणि चर्चेवर तोडगा काढण्यात आला.
  • २००६ ला रशिया आणि इराण यांच्यात अणुशक्ती संशोधन या विषयी तोडगा काढण्यात आला.
  • २००८ ला भारताने समुद्रातून सक्षम बैलिस्टिक मिसाइल ची चाचणी केली, जे मिसाईल अण्वस्त्रे घेऊन जाण्याची क्षमता ठेवते.
  • २०१९ ला आजच्या दिवशी पुलवामा हल्ल्याच्या १२ दिवसानंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तान मध्ये जाऊन आतंकवाद्यांचे लाँचपॅड उडवून टाकले.

हे ही वाचा…

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here