आजचे दिनविशेष व राशिभविष्य (दि.२७ फेब्रुवारी २०२२)

जाणून घ्या आज रविवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजीचे पंचांग, दिनविशेष व आपले राशिभविष्य

पंचांग – रविवार : माघ कृष्ण ११/१२, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय पहाटे ५.०३, चंद्रास्त दुपारी ३.१९, भागवत एकादशी, भारतीय सौर फाल्गुन ८ शके १९४३.

मेष : प्रतिस्पर्ध्याची क्षमता ओळखून कामाला लागावे लागेल. आपल्या स्वभावाचा फायदा घेवू देवू नका.

वृषभ : जोखमीची गुंतवणूक लाभदायक ठरु शकते. कर्तृत्वाच्या बळावर शाबासकी मिळेल.

मिथुन : विनाकारण वाद ओढवून घेवू नका. व्यापारी वर्गाला यशप्राप्तीसाठी मेहनत घ्यावी लागेल.

कर्क : कौशल्याच्या बळावर व्यवसायात उतरावे लागेल. जबाबदा-या वाढतील.

सिंह : कुणाकडून फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. प्रगतीचे मार्ग निर्माण होतील.

कन्या : प्रवासात सावधानता बाळगावी लागेल. सामाजीक प्रतिष्ठा वाढेल.

तुळ : बोलतांना संयम आवश्यक ठेवावा लागेल. हितशत्रूंच्या कारवाया लक्षात घ्याव्या लागतील.

वृश्चिक : जनसंपर्कात वाढ होवून मानसन्मान मिळेल. नातेवाईकांकडून महत्वाची बातमी समजेल.  

धनु : गुंतवणुकीत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल. आर्थिक स्थिती सुधारेल.

मकर : नवीन व्यवसायातून लाभ होईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.

कुंभ : परिवारातील सदस्यांसोबत उत्तम वेळ व्यतीत होईल. मिळकतीचे नवनवीन मार्ग सापडतील.

मीन : आपल्या बुद्धिमत्तेचा इतरांना लाभ होईल. न्यायालयीन कामकाजात प्रगती होईल.

दिनविशेष – आपल्या काव्यप्रतिभेने अवघ्या मराठी जनांना एक अभिमान देणार्‍या कविवर्य कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. हाच दिवस महाराष्ट्र शासनाने मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करायचे घोषित केले. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला आणि हा दिवस आपण ‘जागतिक मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा करतो. १९९९ ः पंधरा वर्षे सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक.२००३ : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने नामेबियाविरुद्ध अवघ्या १५ धावांत सात गडी बाद करून विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी नोंदविली.२००३ ः राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील जैवरसायनशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ डॉ. मोहंमद इस्लाम खान यांना केंद्राच्या जैवतंत्रज्ञान विभागाचा राष्ट्रीय जैवविज्ञान पुरस्कार जाहीर. ‘ग्लायकोबॉयॉलॉजी’ आणि ‘बायोनॅनोटेक्‍नॉलॉजी’ या विषयात त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल हा सन्मान मिळाला आहे.२००१ : जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर एकाच वेळी मारा करता येणाऱ्या ‘आकाश’ या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.


हे ही वाचा…

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here