आजचे दिनविशेष व राशिभविष्य (दि.२८ फेब्रुवारी २०२२)

जाणून घ्या आज सोमवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ रोजीचे पंचांग दिनविशेष व आपले राशिभविष्य

पंचांग – सोमवार : माघ कृष्ण १३, चंद्रनक्षत्र उत्तरा/श्रवण, चंद्रराशी मकर, चंद्रोदय पहाटे ५.५५, चंद्रास्त दुपारी ४.२४, सोमप्र

मेष : जुने वाद मिटतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

वृषभ : कौटूंबिक वातावरण आनंदी व उत्साही राहील. व्यापारी वर्गाला चांगला दिवस राहील.

मिथुन : आलेल्या संधीचे सोने करता येईल. मित्रांकडून फायदा होण्याची शक्यता.

कर्क : एखादा महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल. प्रलंबीत कामे पुर्ण करावी.

सिंह : आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. विचारपुर्वक निर्णय घ्यावा लागेल.

कन्या : गरजवंताला योग्य प्रमाणात मदत करावी. बुद्धीच्या वापराने कामे पुर्णत्वास जातील.

तुळ : एखाद्या चांगल्या कामासाठी पैसे खर्च होवू शकतात. होतील. मंगल कार्यात सहभागी व्हाल.

वृश्चिक : गोंधळलेल्या अवस्थेत शांतपणे विचार करावा लागेल. अध्यात्मिक आवड निर्माण होईल.

धनु : एखादे आवडीचे काम करण्याची संधी मिळेल. नव्या योजना पुर्ण करण्यावर भर राहील.

मकर : प्रलंबित कामे मार्गी लागल्याने समाधान लाभेल. कुणाकडून फसगत होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कुंभ : विद्यार्थी वर्गास चांगला दिवस राहील. दिवस मजेत जाईल.

मीन : वादाचे आणि रागाचे प्रसंग कटाक्षाने टाळावे लागतील. एखादा प्रवास घडेल.

दिनविशेष – २००० – मराठी विज्ञान परिषदेचे मानद कार्यवाह आणि राष्ट्रीय विज्ञान प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अ. पां. देशपांडे यांना विज्ञान व तंत्रज्ञानासाठीचा केंद्र सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. २००४ – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २००२ आणि २००३ च्या सी. के. नायडू पुरस्कारासाठी अनुक्रमे बुजुर्ग क्रिकेटपटू भाऊसाहेब निंबाळकर आणि माजी कर्णधार चंदू बोर्डे यांची निवड केली.२०११ – ‘द किंग्ज स्पीच’ला ८३व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटासह चार पुरस्कार. सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता व पटकथा असे चार पुरस्कार या चित्रपटाने मिळविले.


हे ही वाचा…

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here