सारसनगरला अडीचशे बालकांना पोलिओ डोस

जायंट्स ग्रुप, मनपा आरोग्य विभाग व अजय फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम

अहमदनगर,दि.२७ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगर, महानगरपालिका आरोग्य विभाग व अजय फाऊंडेशनच्या वतीने शहरातील सारसनगर भागात रविवारी (दि.२७ फेब्रुवारी) पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात आली. या परिसरातील पाच वर्षा आतील अडीचशे बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले.  
या अभियानाप्रसंगी नगरसेवक प्रकाश भागानगरे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सतिश राजूरकर, जायंट्स वेलफेअर फाउंडेशनचे कमिटी सदस्य संजय गुगळे, जायंट्सच्या अध्यक्षा विद्या तन्वर, सचिव देविका छजलानी, प्रशांत छजलानी, वैद्यकिय अधिकारी आयेशा शेख, परिचारिका राजपूत, कांबळे, आंगणवाडी सेविका शालिनी आरे, विमल डहाके, मदतनिस शीला गोरे, यश कुमार, पृथ्वी कुमार, सुधीर पवार, डॉ. अनिल  गर्जे, अनिल शिंदे आदींसह नागरिक उपस्थित होते.

प्रकाश भागानगरे म्हणाले की, पोलिओमुक्त म्हणून राज्याची व देशाची वाटचाल सुरु आहे. यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य केले आहे. कोरोनासाठी देखील सर्वांनी लसीकरण करुन देश कोरोनामुक्तीसाठी सहकार्य करण्याचे त्यांनी सांगितले. संजय गुगळे यांनी आजची लहान मुले उद्याच्या भारताचे भविष्य आहे. सक्षम पिढीसाठी पोलिओ मोहिमेत जायंट्सच्या माध्यमातून योगदान देण्यात आले आहे. कोरोनामुक्तीसाठी देखील लसीकरण व कोरोना नियमांबाबत जनजागृती सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमात पोलिओ अभियानातील कर्मचार्‍यांसाठी अल्पोपहार व बालकांसाठी चॉकलेट व बिस्किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यंग जायंट्सचे यश कुमार, पृथ्वी कुमार यांनी परिश्रम घेतले.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here