व्हाट्सएपच्या स्टेटसमुळे दोन कुटुंबात हाणामारी, एका महिलेचा मृत्यू

पालघर,दि.१४ फेब्रुवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – दोन कुटंबात झालेल्या वादात एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. पालघर जिल्ह्यात व्हाट्सएपच्या स्टेटसमुळे दोन कुटुंबात वाद झाला आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत महिला गंभीर जखमी झाली होती आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दोन महिलांसह तिघांना पोलिसांनी या महिलेच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे.

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एका ४८ वर्षीय महिलेचा दोन कुटुंबांमध्ये झालेल्या भांडणात गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. मृताच्या मुलीने ठेवलेल्या व्हाट्सएपच्या स्टेटसवरून १० फेब्रुवारी रोजी हाणामारी झाली होती. ही घटना बोईसर येथील शिवाजी नगर परिसरात घडली. पोलिसांनी सांगितले की, मृत महिलेची मुलगी प्रीती प्रसाद (वय, २०) हिने तिच्या शेजारी राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीसोबतचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर टाकला होता. मात्र हे त्या मुलीला आणि तिच्या घरच्यांना आवडले नाही.

यामुळे ती मुलगी तिची आई आणि भावासोबत प्रीतीच्या घरी तिला भांडायला गेली. हे भांडण वाढले आणि हाणामारी झाली. यात लीलावती देवी प्रसाद जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, बोईसर पोलिसांनी अल्पवयीन मुलगी, तिची आई, भाऊ आणि बहीण यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here