कौडाणे-मुळेवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी उत्तम मुळे तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब मुळे

कर्जत,दि.१७ एप्रिल,(नगरसंचार वेब प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यातील कौडाणे-मुळेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी उत्तम मुळे तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब मुळे यांची बिनविरोध निवड झाली. सदर निवडी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. बी. पाटील आणि राहुल घालमे यांनी जाहीर केल्या. 

कर्जत तालुक्यातील कौडाणे-मुळेवाडी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली होती. यावेळी पदाधिकारी निवड करताना बिनविरोध करण्यासाठी सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. यामध्ये अध्यक्षपदी उत्तम पंढरीनाथ मुळे व उपाध्यक्षपदी भाऊसाहेब ज्ञानदेव मुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यासाठी सरपंच बबन मुळे, उपसरपंच अरुण मुळे, माजी सरपंच दत्तात्रय मुळे, दत्तात्रय गांगर्डे, सुनील पवार,बंडूनाना सूर्यवंशी,संतोष सूर्यवंशी,प्रा. आबासाहेब मुळे, नरेंद सुद्रीक,शासकीय ठेकेदार गणेश मुळे, अनिल सुद्रीक,दिवाण मुळे, संतोष मुळे, संजय सूर्यवंशी,भाऊसाहेब सूर्यवंशी,हनुमंत मुळे, शहाजी सुद्रीक,हरिश्चंद्र मुळे,माजी अध्यक्ष शिवदत्त मुळे, भाऊसाहेब जगताप,विश्वनाथ सूर्यवंशी, झुंबर पवार,अनिल मुळे, ठकूबाई मुळे, ज्ञानदेव खोरे, आदींनी परिश्रम घेतले.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here