वयाच्या ९३ वर्षी घेतला अखेरचा श्वास
अहमदनगर,दि.२ फेब्रुवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ९३ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. याबद्दलची माहिती त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. चारच दिवसांपूर्वी ३० जानेवारी रोजी त्यांनी आपला ९३ वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.